Urmila Matondker
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला(Urmila Matondker) कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर ट्विटद्वारे कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)असल्याची माहिती दिली आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हटने आहे की, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.
उर्मिला मातोंडरने हे ट्विट करताच तिचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. उर्मिला मातोंडकर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्मिला मातोंडकरने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले की तिला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या तिने स्वतःला क्वारंटाईन केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.