अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. सोनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून प्रेग्नंसीच्या काळातील अनेक लहान लहान गोष्टी ती शेअर करत असते. सोनम प्रेग्नंट राहिल्यापासून ती अनेक ग्लॅमरस फोटोशूट करत आहे. पती आनंद अहूजाबरोबरही ती अनेक फोटो शेअर करत असते. नुकताच तिने बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनमने पती आनंद अहुजासोबत बोल्ड फोटोशूट करत ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती.
सोनमने मध्यंतरी बेबी बंप फ्लाँट करत ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये आई होणाऱ्या सोनमच्या चेहऱ्यावरचा ग्लोने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
नुकताच सोनमने बेबी बंप सोबतचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे पती आनंद अहुजाबरोबरचा एक व्हिडीओ देखील शेअर केलाय.
ब्लॅक ड्रेसमध्ये मिरर सेल्फी घेत बेबी बंपबरोबरचा फोटो सोनम शेअर केला आहे. बऱ्याच दिवसांनी सोनमने तिचा फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.
सोनमचा पती आनंद अहुजा मुंबई, दिल्ली, लंडनला येऊन जाऊन असतो. रविवारी आनंद घरी येताच सोनमने त्याच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केलाय.
सोनम आणि आनंद येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी फार उत्साही आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवत फोटोशूट करत असतात.