JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / So expensive! ज्या ड्रेसवरून प्रियांका चोप्रा झाली ट्रोल; त्याची किंमत वाचूनच येईल चक्कर

So expensive! ज्या ड्रेसवरून प्रियांका चोप्रा झाली ट्रोल; त्याची किंमत वाचूनच येईल चक्कर

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) 74 व्या बाफ्टा अवॉर्डमध्ये (BAFTA Awards 2021) हा खास ड्रेस घातला होता.

0108

बॉलिवूडपासून हॉलिवूड पर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) 74 व्या बाफ्टा अवॉर्ड (BAFTA Awards 2021) मध्ये दिसली होती. तर या सोहळ्यासाठी तिने हटके स्टाईलमध्ये ड्रेस घातला होता. तर तिच्या ड्रेसची सगळीकडे चर्चा रंगली, ती ट्रोलसुद्धा झाली. पण तितकाच हा ड्रेस महागदेखील आहे. ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

जाहिरात
0208

प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. प्रियांकाने ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिविजन अवार्ड्समध्ये हा खास ड्रेस परिधान केला होता.

जाहिरात
0308

प्रियांकाने या सोहळ्यासाठी डिझायनर जॅकेट घातलं होतं. तर पती निकसोबत तिने खास फोटोशूटही केलं होतं.

जाहिरात
0408

हा इव्हेंट रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यासाठी प्रियांकाने दोन वेगवेगळे आऊटफिट घातले होते.

जाहिरात
0508

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात प्रियांकाने गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. ते एका महागड्या ब्रॅंडचं होत. त्याची किंमत 3915 युरो आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत 3,52075 रुपये इतकी आहे.

जाहिरात
0608

प्रियांकाने डच फॅशन डिझायनर रोनाल्ड वॅन डेर कॅम्पच्या डिझाइनचं काळ्या रंगाचं सिल्क मिकाडो जॅकेट परिधान केल होतं.

जाहिरात
0708

हे जॅकेट पुढील बाजूने खुलं होत. तर खाली पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. त्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.

जाहिरात
0808

प्रियांकाने या संपूर्ण ड्रेस सोबत डिझायनर ज्वेलरी देखील घातली होती. त्यामध्ये नेकपिस आणि इअरिंग होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या