अभिनेत्री मयुरी देशमुख हिंदी मालिकेत झळकत आहे. तर आता ती निगेटिव्ह रोल प्ले करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुख प्रसिद्ध हिंदी मालिका इमली मध्ये काम करत आहे. त्यातील तिची मलिनीची भूमिका हिट ठरत आहे. पण आता ती खलनायिकेच्या रुपात दिसणार असल्याचं समजतं आहे.
मालिनी हे पात्र अतिशय समजूतदार आणि संयमी दाखवण्यात आलं होत. पण आता ते नकारात्मक होणार आहे अशी माहिती मिळत आहे.
मालिकेत आदित्य म्हणजेच मलिनीचा नवरा हा इमलीच्या प्रेमात आहे. मालिनीच्या हळू हळू आता गोष्टी लक्षात येऊ लागल्या आहेत.
त्यामुळे आता ती निगेटिव्ह होणार असल्याचं दिसत आहे. अनेक मालिकांमध्ये मयुरी ही सोज्वळ आणि सालस भूमिका साकारत आली आहे. त्यामुळे तिचं हे वेगळं रूप पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.