JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कंगनाचा सनसनाटी आरोप; 'तू आता संपलीस!' सलमानबरोबरचा चित्रपट नाकारला म्हणून आदित्य चोप्राने दिली होती धमकी

कंगनाचा सनसनाटी आरोप; 'तू आता संपलीस!' सलमानबरोबरचा चित्रपट नाकारला म्हणून आदित्य चोप्राने दिली होती धमकी

‘सुलतान’ नाकारला तेव्हा, “तू आता संपलीस” या शब्दांत आदित्य चोप्राने आपल्याला धमकी दिली होती, असं कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर Nepotism आणि चित्रपटसृष्टीतल्या एकाधिकारशाहीबद्दल सडेतोड बोलणाऱ्या कंंगना रानौटने आज एका मुलाखतीत आदित्य चोप्रावर सनसनाटी आरोप केला आहे. “तू आता संपलीस” या शब्दांत आदित्य चोप्राने आपल्याला धमकी दिली होती, असं कंगना म्हणाली. ‘यशराज’चा चित्रपट नाकारला म्हणून आदित्य चोप्राने आपल्याला धमकावलं होतं, असा तिचा आरोप आहे. यशराज फिल्म्सच्या सुलतान नावाच्या चित्रपटाबद्दल आपल्याला विचारलं होतं. सलमान खानबरोबरचा हा चित्रपट मी नाकारला. तेव्हा आदित्य चोप्राला राग आला आणि त्याने धमकावलं, असं कंगनाने रिपब्लिक टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “तनू वेड्स मनूसारखा चित्रपट माझ्या एकटीच्या जिवावर चालला होता. त्यामुळे त्यापुढे आता कुठल्याही खानांबरोबरचा चित्रपट करायची माझी इच्छा नव्हती. म्हणून मी चित्रपट नाकारला,” असं कंगना म्हणाली.

संबंधित बातम्या

अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांचा सुलतान हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होता. सुरुवातीला कंगनाने हा चित्रपट नाकारल्याची बातमी आली होती. पण नंतर विशाल भारव्दाजच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या तारखा जुळत नसल्याने तिने चित्रपट नाकारला, अशा बातम्या आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या