JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडला पुन्हा धक्का! कॅन्सरशी लढा हरली अभिनेत्री; मृत्यूपूर्वी लिहिली भावुक पोस्ट

बॉलिवूडला पुन्हा धक्का! कॅन्सरशी लढा हरली अभिनेत्री; मृत्यूपूर्वी लिहिली भावुक पोस्ट

अभिनेत्रीच्या बहिणीने तिच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : 2020 म्हणजे बॉलिवूडसाठी वाईट असं वर्षच आहे. कित्येक प्रसिद्ध कलाकार गमावल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री, मॉडेल आणि गायक दिव्या चौकसेचं (Divvya Chouksey) कॅन्सरमुळे निधन झालं आहे. त्यामुळे  बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 2011 साली दिव्या मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाली होती. 2016 साली तिने दिल तो आवारा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. 2018 साली दिव्याने पटियाले दी क्वीन हे पहिलं गाणं गायलं. यानंतर ती कित्येक दिवस कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली.  दिव्याची बहीण सौम्या अमीश वर्माने दिव्याच्या निधनाबाबत फेसबुक पोस्टवर माहिती दिली आहे.

दरम्यान दिव्याने आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर भावूक अशी पोस्टही केली होती.

दिव्याने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, “मी जे सांगणार आहे, त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. शब्द भरपूर असले तरी ते कमी आहेत. मला गायब होऊन कित्येक महिने झाले आणि खूप मेसेज आले. आता या वेळेला मी तुम्हाला सांगते मी माझ्या मृत्यूशय्येवर आहे. मी खूप मजबूत आहे, त्या आयुष्यासाठी जिथं संघर्ष नाही. कृपया काहीही प्रश्न विचारू नका. तुम्ही माझ्यासाठी काय आहात, हे फक्त देवालाच माहिती आहे” हे वाचा -  या 2 भयावह मानसिक आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं; 7 दिवस होता रुग्णालयात या वर्षात  बॉलिवूडने अनेक प्रसिद्ध कलाकारांना गमावलं आहे.  सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, वाजिद खान, इरफान खान, सरोज खान यांचं निधन झालं. त्यामुळे  बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या