अभिनेत्री ‘धनश्री काडगावकर’ (Dhanashree Kadgaonkar) मुलाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतली आहे. धनश्री सोशल मीडियावर सक्रीय असून सतत ती तिचे फोटो शेअर करत असते. आज तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा गॉर्जियस लुक पाहायला मिळाला. पाहा धनश्रीचे खास फोटो.
सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर आजही तिच्या वहिनीसाहेब या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
धनश्री बाळाबरोबर मस्ती करतानाचे तर कधी जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
प्रेग्नंसीनंतर धनश्रीने तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. पोस्ट प्रेग्नंसीनंतर धनश्री पुन्हा तिच्या जुन्या अवतारात परतली आहे.
धनश्रीने आज तिच्या चाहत्यांना 'गुड मॉर्निंग' म्हणत तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत.
नुकतंच धनश्रीनं तिच्या लेकासोबत सुंदर पारंपरिक वेशात फोटोशूट केलं. लेकासोबतच्या फोटोशूटला चाहत्यांनी फार सुंदर प्रतिसाद दिला.