अनाया सोनी
मुंबई. 2 ऑक्टोबर : ‘मेरे साई’ या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘मेरे साई’च्या सेटवर शूटिंग करत असताना ती अचानक बेशुद्ध पडली. अनाया सोनीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि शूटिंग थांबवण्यात आलं. अनायाच्या इनस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या प्रकृतीविषयीची अपडेट चाहत्यांना दिली जात आहे. अनायाची प्रकृती बिघडण्याचं कारण तिची किडणी आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीची किडनी खराब झाली आहे, त्यामुळे ती सध्या डायलिसिसवर आहे. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार, ‘अनाया सोनीच्या वडिलांनीही सांगितले की तिची आर्थिक स्थितीही चांगली नाही. अनायावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मुलीच्या किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनया सोनीच्या वडिलांना सतावत आहे’. हेही वाचा - Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा-अलीच्या मेहंदी-संगीताचे फोटो आले समोर; रॉयल लुकची होतेय तुफान चर्चा अनायानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, डॉक्टर सांगत आहेत की माझी किडनी निकामी झाली आहे आणि मला डायलिसिसवर जावे लागेल. माझे क्रिएटिनिन 15.67 पर्यंत खाली आले आहे आणि हिमोग्लोबिन 6.7 आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सोमवारी मी अंधेरी पूर्व येथील होली स्पिरिटमध्ये प्रवेश घेत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्यासाठी जीवन हे सोपं नव्हतं पण आजचे जगणे सोपे करण्याचा प्रयत्न करत होते. पण हो, वेळ येणार होती, हे मला माहीत होतं. ही वेळही जाईल. मी लवकरच किडनी प्रत्यारोपण करणार आहे. मी डायलिसिसनंतर किडनीसाठी अर्ज करेन’.
दरम्यान, 2015 पासून ती फक्त एकाच किडनीवर जगत असल्याचेही उघड झाले. काही वर्षांपूर्वी अनाया सोनीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दान केली होती. मात्र आता ती एक किडनीही निकामी झाली. त्यामुळे आता अनायाला किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे.