JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तब्बल 2 वर्षे सुरू होतं 'गंगुबाई काठियावाडी'चं शुटींग; आलियाने सांगितला थक्क करणारा अनुभव

तब्बल 2 वर्षे सुरू होतं 'गंगुबाई काठियावाडी'चं शुटींग; आलियाने सांगितला थक्क करणारा अनुभव

कोरोना, लॉकडाउन, वादळ वारे सहन करत चित्रपटाचं शुटींग झालं पूर्ण. आलियाने ग्गुबाई काठियावाडीचा अनुभव सांगीतला आहे.

0107

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा बहुप्रतिक्षीत 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाचं शुटींग अखेर पूर्ण झालं आहे. लॉकडाउनमुळे चित्रपटाचं चित्रिकरण लांबणीवर पडत होतं. पण अखेर आता ते पूर्ण झालं आहे.

जाहिरात
0207

अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच भन्साळींच्या चित्रपटात काम करत आहे. गंगुबाई हे मुख्य पात्र ती साकारत आहे. एका वेश्येच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असल्याने एक वेगळी कथा भन्साळी घेऊन येत आहेत.

जाहिरात
0307

नुकतच चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. यावर आलियाने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते, 'आम्ही ८ डिसेंबर २०१९ ला शुटींग सुरू केलं होतं. आणि आता दोन वर्षांनंतर शुटींग संपवत आहोत. हा चित्रपट दोन लॉकडाउन दोन वादळं पाहून गेला. दिग्दर्शक आणि कलाकारांना कोरोना होऊन गेला. चित्रपटाच्या सेटने जे काही सहन केलं तो एक नवा चित्रपटचं ठरेलं.'

जाहिरात
0407

यानंतर आलियाने सगळ्यांचे आभार मानत मोठी पोस्ट लिहीली आहे. तर शेवटी 'लव्ह यु गंगु' असही म्हटलं आहे.

जाहिरात
0507

आलियाच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.

जाहिरात
0607

चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांना आतुरता आहे.

जाहिरात
0707

याशिवाय आलियाच्या हातात आणखी काही चित्रपट आहेत. करण जोहरच्या प्रोडक्शनचा आणखी एक नवा चित्रपटही नुकताच तिला मिळाला आहे. रणवीर सिंग सोबत ती त्यात झळकणार आहे. चित्रपटाचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या