नाटक (Drama) सिनेमा ( Cinema) टेलिव्हिजन ( Television) अशा तिन्ही माध्यमातून ज्यानं अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असा मराठमोळा अभिनेता म्हणजे सुबोध भावे ( Subodh Bhave) सुबोध भावे अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. सुबोधचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचं शुटींग अभिनेत्यानं त्याच्या आवडत्या गावी सुरू केलं आहे. सुबोध भावेचं आवडतं गाव ( Subodh Bhave favorite village) आहे तरी कोणतं जाणून घ्या.
अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित नवा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नाव मात्र सुबोध अद्याप गुलदस्त्यात ठेवल आहे.
सुबोध गेली अनेक दिवस या सिनेमाच्या संहितेवर काम करत होता. दिग्दर्शक म्हणून सुबोधचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यातील सुबोधच्या आवडत्या गावी म्हणजे वाई येथे सिनेमाचं शुटींग सुरू आहे.
'आवडत्या गावात शूटिंग असणं या सारखा आनंद नाही', असं म्हणतं सुबोधनं फोटो शेअर केला आहे.
मराठीतील प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे. तर नितीन वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.