मुंबई, 30 नोव्हेंबर : रेल्वेतून प्रवास करणं खरं तर सर्वांसाठी सोपं नसतं आणि बॉलिवूड सेलिब्रेटी म्हटलं की सर्वच सेलिब्रेटींचा विमाननं प्रवास करण्याकडे कल असलेला दिसून येतो. पण नुकताच एक बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विमान नाही तर चक्क रेल्वेतून प्रवास करताना दिसला. इतकंच नाही तर या प्रवासात त्यांना सामान्य लोकांप्रमाणे रेल्वेतील समस्यांचा सामना करावा लागला. या अभिनेत्यानं त्याच्या रेल्वे प्रवासाचा हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ते ट्रेन अटेंडन्टच्या सीटवरून प्रवास करताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्यांना नीट ओळखणंही कठीण झालं आहे. हा अभिनेता आणखी कोणी नाही तर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता संजय मिश्रा आहेत. संजय मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते ट्रेन अटेंडन्टच्या सीटवरुन झोपलेले दिसत आहेत. संजय अटेंडन्टच्या सीटवर झोपलेले असतात आणि अचानक त्यांच्यासमोर कॅमेरा येतो. त्यानंतर आरपीएफ पोलिसांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देतना त्यांनी लिहिलं, कधी पॅसेंजर, कधी अटेंडन्ट. फक्त जीवनाचा प्रवास एन्जॉय करायचा दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यांच्या या ट्वीटमध्ये त्यांनी ऑफिशिअल IRCTC अकाउंटला आणि रेल्वे मिनिस्ट्रीला सुद्धा टॅग केलं आहे. जेठालालसाठी ‘तारक मेहता…’मध्ये परतणार दयाबेन, पण…
ही ट्रेन आहे ‘ऑगस्ट क्रांती’ जी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करते. या ट्रेनधून संजय यांनी एका प्रसिद्ध सेलिब्रेटी सारखं नाही तर एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रवास केला. त्यांनी ट्रेनचं रिझर्व्हेशन केलं होतं मात्र सीट कन्फर्म न झाल्यानं अटेंडरच्या सीटवरुन प्रवास करावा लागला. हैदराबाद बलात्कार प्रकरण: बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप
याआधी सुद्धा संजय मिश्रा यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते काही महिलांसोबत जात्यावर डाळ दळताना दिसत होते. या व्हिडीओमध्ये ते एखाद्या समान्य व्यक्तीसारखं काम करताना दिसत होते. संजय मिश्रा यांनी आतापर्यंत अनेक बिग बजेट सिनेमात भूमिका साकरल्या आहेत. त्यांनी कॉमेडी ते गंभीर अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. रॅपर बादशाहने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं ‘या’ कारणामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड!