अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या उत्कृष्ट निवेदनाने तसेच अभिनयाने त्याने अनेकांचं मन जिंकलं आहे. तर आता त्याने त्याच्या कठीण काळातील काही प्रसंग सांगितले आहेत.
अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या उत्कृष्ट निवेदनाने तसेच अभिनयाने त्याने अनेकांचं मन जिंकलं आहे. तर आता त्याने त्याच्या कठीण काळातील काही प्रसंग सांगितले आहेत.
मनीष पॉलने एक कठीण काळ पाहिला आहे, जेव्हा तो जवळपास १ वर्षापर्यत बेरोजगार होता. तेव्हा त्याची पत्नी त्याच्यामागे खंबीर उभी होती.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेच्या इंस्टाग्राम वर मनीष पॉलने त्याच्या आयुष्यातील काही किस्से सांगितले आहेत. तर आपल्या पत्निला तो लहानपणापासून ओळखत असल्याचही तो म्हणला.
मनीष संयुक्ताच्या आईकडे ट्युशन साठी जायचा.तेव्हा त्यांची जास्त ओळख निर्माण झाली. तर संयुक्ताने मला अभिनय करिअरसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला.
मनिषने सांगितल एकदा वर्षभर त्याच्याकजे कोणतचं काम नव्हतं. तेव्हा संयुक्ताने त्याची साथ दिली. तसेच पुढे जाण्यासाठी बळही दिलं.
मनिष आणि संयुक्ता आता दोन मुलांचे पालक आहेत. व संयुक्ता आयुष्यात नसती तर आयुष्य पुर्ण झालं नसतं असंही त्याने म्हटलं.