मुंबई,3 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ने Aai Kuthe Kay Karte Latest Episode) अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळतात. मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत संजनाची नकारात्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (rupali bhosle) हिने साकारली आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी रूपाली (rupali bhosle new look) तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकताच रुपाली भोसले हिने नवीन हेअर कट केला आहे आणि हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या नवीन लुकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. रूपालीने अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, कंटाळवाण्या केसांसाठी आयुष्य खूपच लहान आहे. शुभ सकाळ. सेल्फी गरजेचा आहे.
रुपाली भोसले हिच्या नव्या हेअर कटला चाहत्यांची पसंती मिळते आहे. या हेअर कटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा लुक छान आहे पण तुम्हाला लाँग हेअर खूप छान दिसत होते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, छान दिसतेस. अशा अनेक कमेंट्स रूपालीच्या या हेअर कटवर आल्या आहेत. वाचा : ‘रमाची खूप आठवण येतेय’ ; जितेंद्र जोशीची दिवाळीनिमित्त भावूक पोस्ट बिग बॉस मराठीमुळे झळकलेले एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.