मुंबई, 11 जानेवारी - आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अभि आणि अनघाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आता हा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे आपल्या कामाला लागणार आहेत. अशातच अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने आता निघायची वेळ झाली, असं म्हणत एक इमोश्नल पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर सध्या या पोस्टची चर्चा आहे. मधुराणी प्रभुलकरने (madhurani prabhulkar) सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये देशमुख कुटुंब सर्व एका फ्रेममध्ये दिसत आहे. निमित्त आहे अभि आणि अनघाच्या लग्नाचे. याशिवाय तिनं जी इमोश्नल पोस्ट लिहिली आहे, त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत या लग्नसोहळ्याचं तसेच अरुंधतीचं कौतुक केलं आहे. तसंच काहींनी अरुंधतीच्या जाण्याचा विचार केला तरी डोळ्या पाणी येतं, असं म्हटलं आहे. मधुराणी प्रभुलकर म्हणते, देशमुखांचं घर गेले महिनाभर अगदी गजबजून गेलेलं. केळवणापासून सुरू झालेली ही धामधूम. संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, गृहप्रवेश काही विचारू नका. सगळे आपले रोज नटून-थटून तयार. फारच मजेत गेला हा महिना. पाहुण्यासारखी कधीतरी सेटवर येणारी आमची सारी जिवलग मंडळीसुद्धा रोज भेटत होती. मग काय गप्पा, किस्से, चहा खारी, हशा आणि टाळ्या. खरोखरच लग्नघर हो! वाचा- ‘आई कुठे..‘च्या सेटवर सर्वांची झाली कोरोना टेस्ट; मुख्य अभिनेत्री पॉझिटिव्ह या मूडमध्ये सगळे असताना आमच्याकडून काम करून घ्यायला आमचे दिग्दर्शक रवी करमरकर (ravi karmarkar) आणि असोसिएट सुबोध बारे (subodh bare) यांना त्रासच झाला असणार. पण तेही मुरलेले. आम्हाला वळणावर कसं आणायचं त्यांना चांगलं ठाऊक आहे. तसे आम्ही सगळे थोडेफार सिन्सिअर वगैरे म्हणून हे कार्य पार पडलं हो! आम्हाला सगळ्यांनाच माणसांची ये जा आवडतेच. भरलेलं घर अजून भरलेलं किती छान वाटतं हो… पण आता सूप वाजणार, मांडव परतणी होणार. घरात नवीन सून आली आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून. कसं करमणार?
आता अरुंधती अभिच्या लग्नानंतर देशमुख कुटुंबात राहणार नाही का, असे अनेक प्रश्न पडत आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवीन काय असणार हे देखील येणाऱ्या भागातच समोर येईल.