JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अरुंधती आशुतोषच्या रोमँटिक गाण्याचा You Tube वर कल्ला; 24 तासात गाठला मोठा पल्ला

अरुंधती आशुतोषच्या रोमँटिक गाण्याचा You Tube वर कल्ला; 24 तासात गाठला मोठा पल्ला

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) मालिकेत सध्या अरुंधतीचा (Arundhati) स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. अरुंधतीने आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलाय. मालिकेत अरुंधतीचं ‘सोबतीस हलके’ (Sobtis Halke) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही (Ashutosh) साथ मिळाली आहे. ‘सुखाचे चांदणे’ (Sukhache Chandane) या गाण्याला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे आता सोबतीस हलके या नव्या गाण्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

0112

आई कुठे काय करते मालिकेतील 'सोबतीस हलके' हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि 24 तासातच गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात
0212

सुखाचे चांदणे' या पहिल्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालिकेतील या नव्या गाण्यानं नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.

जाहिरात
0312

अरुंधती आणि आशुतोषचं नवं गाणं प्रेक्षकांच्या प्रचंड आवडलं असून यूट्यूबवर गाणं ट्रेडिंगमध्ये आहे.

जाहिरात
0412

मालिकेतील साईड साँग यूट्यूबवर ट्रेडिंगमध्ये असण्याची ही पहिलीच वेळ आणि पहिलीच मालिका आहे असं म्हणायला हरकत नाही.

जाहिरात
0512

गाण्याचा BTS व्हिडीओ देखील प्रदर्शित झाला आहे. ज्यात कलाकारांनी गाणं शुट करताना केलेली सगळी धम्माल पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0612

सोबतीस हलके, सावलीस ऊन... भोवती तशी ही, मोरपीस खूण... असे गाण्याचे सुंदर शब्द गायक श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत.

जाहिरात
0712

तर गायक मंदार आपटे आणि गायिका विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे.

जाहिरात
0812

निलेश मोहरीर याने हे गाणं संगीतबद्ध केलं असून या गाण्याच्या विशेष भागातही तो झळकला आहे.

जाहिरात
0912

या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात
1012

गाण्याला एकत्रितपणे १ मिलियन पेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.

जाहिरात
1112

अरुंधती आणि आशुतोष यांच पहिलं एकत्र रोमँटिक गाणं You Tubeवर सध्या गाणं सहाव्या (6 on Trending) क्रमांकावर आहे

जाहिरात
1212

मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आलेला आशुतोष आणि त्याची गाणी नवे रंग घेऊन येणार आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या