मुंबई, 25 जानेवारी- आई कुठे काय करते **(Aai Kuthe Kay Karate)**ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. मागच्या काही दिवसांपासुन मालिकेत अरुंधती (Arundhati) दिसत नव्हती. मात्र आता मालिकेत अरुंधतीचे कमबॅक (Arundhati Is Back) झालं आहे. तब्येतीच्या कारणामुळे अरुंधतीने मालिकेत ब्रेक घेतला होता. मात्र आता अरुंधतीची रीएंट्री झाली आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मालिकेत अरुंधती नसल्याने प्रेक्षक तिला मिस करत होते. तिच्य परत येण्यामुळे प्रेक्षकांच्यात मात्र आनंदाचे वातावरण आहे. आई कुठे काय करते मालिकेचे कथानक अरुंधतीभोवती फिरताना दिसते. अशातच अभि आणि अनघाच्या लग्नानंतर मालिकेतून अचानक गायब झाल्याने प्रेक्षकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते. मात्र अरुंधती तिच्या आईसोबत देवदर्शनाला गेली होती. अशातच तिच्या बसचा अपघात होतो. मात्र ती आणि तिची आई सुखरुप आहे. आता ती देवदर्शनावरून परतली आहे. अरुंधती समृद्धी निवासमध्ये सुखरूप पोहचली आहे. तिला सुखरूप पाहून आई-आप्पा, यश, अनघा, गौरी सर्वांनाच आनंद झाला आहे. गायब असलेली अरुंधती कुठे होती आणि काय करत होती याचे उत्तर आता सर्वांना मिळाले आहे.
अरुंधती जरी देशमुख कुटुंबात, तिच्या माणसात परतली असली तरी ती आता जास्त काळ या घऱात राहणार नसल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून समोर आलं आहे. कारण ती अभि आणि अनघाच्या लग्नापर्यंत या घऱात राहणार होती. त्यामुळे पुन्हा ती समृद्धी निवास सोडणार की सगळ्यांच्या प्रेमाखातर ती परत याच घरात राहणार, हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय या घऱातून बाहेर पडून ती नवीन आयुष्य सुरू करणार का, हे देखील येत्या भागातच समोर येईल. पण अरुंधतीच्या परत येण्यामुळे देशमुख कुटुंबात तर आनंदाचे वातावरण आहेच शिवाय प्रेक्षकांच्यात देखील आनंदाचे वातावरण आहे.
अरुंधतीची भूमिका साकराणारी मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) मागच्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नव्हती. मात्र तिच्या या भूमिकेशीसंबंधीत काही गोष्टी शेअर करत होती. प्रेक्षकांकडून देखील या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत होता.