JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आई कुठे काय करते' मधील देशमुखांच्या नव्या सूनबाईंचा नवाकोरा लुक पाहिला का?

आई कुठे काय करते' मधील देशमुखांच्या नव्या सूनबाईंचा नवाकोरा लुक पाहिला का?

आई कुठे काय करते’ मधील देशमुखांच्या घरात थोरल्या सूनबाईंचे आगमन झाले आहे. आता लग्नानंतर नव्या नवरीचा पहिला वहिला लुक समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी- आई कुठे काय करते (aai kuthe kay karate latest episode) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकपैकी एक आहे. या मालिकेने कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा वेगळा चाहता वर्ग आहे. मग ती अरुंधती असो की नकारात्म भूमिका साकारणारी संजना यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मागच्या काही दिवसांपासून मालिकेत अभि आणि अनघाच्या लग्नाची धूम आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अभि आणि अनघाच्या लग्नाची व त्यांच्या लुक सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता या दोघांचे लग्न थाटात पार पडले आहे. देशमुखांच्या घरात थोरल्या सूनबाईंचे आगमन झाले आहे. आता लग्नानंतर नव्या नवरीचा पहिला वहिला लुक समोर आला आहे. अनघाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना देखील अनघाचा लुक आवडलेला आहे. कमेंट करत अनेकांनी तिच्या लुकचे कौतुक केले आहे. अनघाच्या व्हायरल झालेल्या लुकमध्ये तीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. शिवाय कपाळी लाल टिकली आणि कानात मोत्याची कर्णफुले सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत. तिचा हा साधा सरळ लुक चाहत्यांना भुरळा घालत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे अनघाची भूमिका या मालिकेत साकारत आहे. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

लग्नाचा प्रसंग साकारताना अश्विनी महांगडे झाली होती भावुक मालिकेतला लग्नाचा प्रसंग साकारताना अश्विनी महांगडे भावुक झाली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या वडिलांना गमावलं. लेकीचं लग्न पहावं अशी त्यांची इच्छा होती मात्र ती अपूर्ण राहिली.मालिकेत जेव्हा कन्यादान आणि सप्तपदीचा प्रसंग शूट होत होता तेव्हा अश्विनी भावूक झाली होती. वडिलांचे शब्द तिला आठवत होते. योगायोगाने अश्विनीच्या वडिलांचं आणि मालिकेतील वडिलांचं नावही प्रदिप आहे.त्यामुळे प्रदिप हे नाव जेव्हा जेव्हा कानावर पडतं तेव्हा मला बाबा आठवतात असं अश्विनी म्हणाली. अनघा ही व्यक्तिरेखा मी फक्त साकारत नाहीय तर ती जगते आहे. त्यामुळे अनघाचं आयुष्य सुखी व्हावं अशी इच्छा माझी सुद्धा होती. असं ती म्हणाली होती. पुढे बोलताना ती म्हणाली होती की, ‘घटस्फोटित स्त्रियांकडे पहाण्याचा समाजाचा वेगळा दृष्टीकोन असतो. पण त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. आयुष्यातला एखादा निर्णय चुकला म्हणून संपूर्ण आयुष्यच चुकीच ठरत नाही. त्यामुळे अनघाचं लग्न समाजातील अनेक अनघांसाठी आशेचा नवा किरण असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या