वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांचा लग्नसोहळा याच महिन्यात पार पडणार आहे. दोघांचा लग्नसोहळा अलिबागमध्ये होणार असून 5 दिवस संपूर्ण लग्नविधी होणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मीडिया अहवालांच्या मते याच महिन्यात हे कपल त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याची शक्यता आहे.
वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. गेल्यावर्षीच दोघांचे लग्न होणार होते मात्र कोरोनामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. ईटाइम्सच्या वृत्तानुसार याच महिन्यात ते लग्न करतील, हा सोहळा 5 दिवसांचा असेल. (फोटो सौजन्य- @varundvn/Instagram)
या वृत्तानुसार दोघाचा विवाहसोहळ 5 दिवस सुरू असणार आहे. 22 ते 26 जानेवारी दरम्यान हे सारे फंक्शन होणार आहेत.
कोरोना काळात लग्न करता न आल्यामुळे आता परिस्थिती काहीशी सुधारू लागल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी अलिबागमधील एक हॉटेल बुक करण्यात आलं आहे. दोघांचं लग्न पंजाबी पद्धतीने होणार आहे आणि ही बिग फॅट वेडिंग असणार आहे
गेल्यावर्षी करवा चौथच्या दिवशी नताशा दलाल अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी असणाऱ्या पुजेमध्ये दिसली होती. तिने देखील लाल जोडा परिधान केला होता. त्यामुळे नताशाने देखील वरुणसाठी करवा चौथचं व्रत केलं असल्याचं बोललं जात होतं. (फोटो सौजन्य- @bhavanapandey/Instagram)
वरुण धवन आणि नताशा शाळेपासून एकमेकांना ओळखतात आणि अनेक वर्ष ते डेट करत आहेत. वरुणने एकदा अशी माहिती दिली होती की ते सहावीमध्ये असताना पहिल्यांदा भेटले होते. 11-12वी पर्यंत ते चांगले मित्र होते आणि त्यानंतर ते अगदी जवळचे मित्र बनले होते. (फोटो सौजन्य-@varundvn/Instagram)