JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण, VIDEO आला समोर

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण, VIDEO आला समोर

रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिंगोली, 27 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने मारहाणीच्या, हत्येच्या, बलात्काराच्या, खुनाच्या घटना समोर येत आहेत. यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल माडियावर व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जागेच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला तत्काळ सोडवून याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर या आरोपींना अटक देखील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  …म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड हादरलं! तुला गोळ्या घालतो म्हणत थेट बंदूक काढली, सोलापुरातला धक्कादायक VIDEO समोर - सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर विमानतळ संदर्भात आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबंधीचा व्हिडिओही समोर आला आहे. सोलापूर विमानतळ संदर्भात केतन शाह हे उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी केली. धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या