JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून सूनेनं चावली सासूची 3 बोटं, पतीलाही केली मारहाण

धक्कादायक! टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून सूनेनं चावली सासूची 3 बोटं, पतीलाही केली मारहाण

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भागात एका महिलेनं टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून आपल्या वृद्ध सासूच्या हाताची तीन बोटे चावली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

जाहिरात

धक्कादायक! टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून सुनेनं चावली सासूची 3 बोटं, पतीलाही केली मारहाण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 सप्टेंबर: सासू-सूनेच्या भांडण आपल्यासाठी नवं नाही. सासू आणि सूनेच्या भांडणाच्या घटना आपल्या नेहमी कानावर पडत असतात. परंतु कधी कधी या भांडणांना गंभीर वळण मिळते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भागात झालेल्या सासू-सूनेच्या भांडणात धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या भांडणातून सूनेनं सासूची तीन बोटे चावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सूनेनं आपल्या वृद्ध सासूच्या हाताची तीन बोटे चावली. एवढंच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पतीलाही महिलेनं मारहाण केली. या घटनेनंतर सासूनं पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या सूनेविरोधात तक्रार केली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितलं म्हणून सूनेनं सासूची तीन बोटे चावल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथील अंबरनाथ येथे घडला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सासू रुशाली कुलकर्णी (60) आपल्या घरी भजन करत होत्या. यादरम्यान त्यांनी त्यांच्या सुन विजया कुलकर्णी (30) हिला टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला आणि नंतर उठून टीव्ही बंद करून टाकला. यामुळं चिडलेल्या विजया हिचा सासू रुशाली हिचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की, विजया हिने आपल्या वृद्ध सासूनची तीन बोटे चावली. आपल्या वृद्ध आईला वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही विजया यांनी मारहाण केली. या घटनेनंतर सासू रुशाली यांनी आपल्या सूनेविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. हेही वाचा:  रिक्षाचालक बनला चोर! 5000 कारची चोरी, हत्या, 3 बायका अन्.., 27 वर्षांची क्राईम फाईल वाचून व्हाल शॉक पोलिसांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “सोमवारी सकाळी सासू रुशाली यांनी आपण भजन करत असल्याचं सांगत विजयाला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी टीव्ही बंद केला. यामुळे संतापलेल्या सुनेनं रुशालीचा हात पकडून तिची तीन बोटे चावली. आवाज ऐकून सासूच्या मदतीसाठी आलेल्या विजयानं पतीलाही मारहाण केली.’’  या घटनेनंतर वृद्ध महिलेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आपल्या सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या