JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सेक्स रॅकेट अड्ड्यावर पोलिसांची रेड! भीतीनं 3 तरुणींची छतावरून उडी, एकीचा मृत्यू

सेक्स रॅकेट अड्ड्यावर पोलिसांची रेड! भीतीनं 3 तरुणींची छतावरून उडी, एकीचा मृत्यू

पोलिसांनी तीन तरुणांना या प्रकरणी ताब्यात घेतलं असून सध्या कसून चौकशी सुरू आहे.

जाहिरात

कोरोनाच्या महामारीमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. असात वेश्या व्यवसायाच्या एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी 3 महिलांसह 10 जणांना या प्रकरणात अटक केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसी, 11 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील परिसरातून सेक्स रॅकेटच्या पर्दाफाश करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकानं सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. संजयनगर कॉलनीमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडण्यात आलं आहे. पकडले जाण्याच्या भीतीनं छतावरून तीन तरुणींनी उडी मारली. यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन तरुणी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिथे राहणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. यासोबतच तीन बाईक, कार, टेम्पो पकडण्यात आला आहे. ज्या घरात हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं ते घर पप्पू सिंह यांचं होतं. ते काही दिवसांपूर्वी तीन मुलं आणि दोन मुलींना भाड्यांने घेतलं होतं. पोलिसांना मिळाले पासपोर्ट पोलिसांना तपासणीदरम्यान तरुणींचे पासपोर्ट मिळाले. यावर त्या महिला विदेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवसांआधी घराखाली उभ्या असलेल्या गाडीवरून स्थानिकांनी वाद घातला होता. त्यानंतर तिथल्या नागरिकांना संशय आला त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावलं आणि याची माहिती पोलिसांना दिली. हेही वाचा- ‘जेसीबी’ने झाला युवकाचा संशयास्पद मृत्यू, मात्र खून झाल्याचा लोकांना संशय पकडण्याच्या भीतीनं छतावरून मारली उडी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणींची पळापळ सुरू झाली. यामध्ये तीन तरुणींनी पकडलं जाण्याच्या भीतीनं चक्क छतावरून उडी टाकली. यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणी जखमी आहेत. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. हेही वाचा- पत्नी होती भाजपची पदाधिकारी, चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने उचलले जीवघेणे पाऊल!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या