मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) 12 एप्रिल: एका विवाहित महिलेनं स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. त्यावेळी तिला वाचवण्याच्या ऐवजी सासरच्या मंडळींनी तिचा व्हिडीओ तयार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या मृत्यूनंतरच त्यांचा कॅमेरा बंद झाला. आत्महत्याचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) वेगानं व्हायरल (Viral) होत आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविले आहे. मृत महिलेच्या सासू आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली असून तिचा नवरा आणि सासरची अन्य मंडळी सध्या फरार आहेत, पोलिसांनी या प्रकरणात हुंड्यासाठी छळवणूक आणि हत्येचा आरोप दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगरमधील (Muzaffarnagar) हा सर्व संतापजनक प्रकार आहे. येथील पलडी गावातील कोमल यांचं लग्न दत्तियाना गावातील देवेंद्रशी झालं होतं. माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनुसार, " लग्नानंतर सासरच्या मंडळींनी कोमलला हुंड्यासाठी मारहाण सुरु केली. सहा महिन्यापूर्वी तिला घराच्या बाहेर काढलं. या प्रकरणात नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर कोमल सासरी गेली. त्यानंतर पुन्हा कोमलचा नवरा आणि सासू-सासऱ्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली," असा माहेरच्या मंडळींचा आरोप आहे. कोमलनं या सततच्या त्रासाला कंटाळून रविवारी आत्महत्या केली. तिनं गळ्यात ओढणी बांधली, त्यानंतर काही वेळ विचार केला आणि गळफास घेत स्वत:ला पंख्याला लटकावून घेतलं, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सासरच्या मंडळींची इच्छा असती तर ते दरवाजा किंवा खिडकी तोडून कोमलचा जीव वाचवू शकले असते. पण ते खिडकीतून लाईव्ह व्हिडीओ तयार बनवत होते. कोमलचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी मोबाईल बंद केले. त्यानंतर दरवाजा तोडून तिचा मृतदेह खाली उतरवला. चौथा फेरा घेताच नवरी दागिन्यांसह फरार, प्रकार लक्षात येताच नवरदेव पोलीस ठाण्यात या प्रकरणात माहेरच्या मंडळींनी कोमलच्या नवऱ्यासह तीन जणांवर हुंड्यासाठी छळवणूक आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कोमलच्या सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. तर तिच्या नवऱ्याचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.