भदोही, 02 फेब्रुवारी: दबंगिरी करणाऱ्यांना बेड्या ठोकणारा पोलीस अधिकारी दादागिरी करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा पोलीस अधिकारी दादागिरी करून तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील भदोही इथे पोलिसांची दबंगिरी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी न्याया मागायला कुणाकडे जायचा असा सवाल उपस्थित होत आहे. जमीनीचा वाद घेऊन तरुण पोलिसांकडे आला मात्र पोलीस अधिकाऱ्याने तो वाद सोडवण्याऐवजी दादागिरी करत तरुणालाच बेदम मारहाण केली. पोलिसांनी तरुणासोबत केलेलं गैरवर्तन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी दमदाटी केली आणि त्याच्याकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली आहे.
जमिनीचा वाद सोडवण्यासाठी तरुण भदोही इथल्या पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी वाद सोडवण्याऐवजी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी चौकशी करून पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. पीडित तरुणाची तक्रार ऐकून न घेता अशा पद्धतीनं पोलिसाने केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. हेही वाचा- मद्यधुंद पोलिसाची गुंडगिरी, गुन्हेगारांना सोबत घेत ‘बार’ मालकाला मारहाण