JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / UP: मारहाण करत पोलिसाची हत्या, 12 तासांच्या आत पोलिसांनी असा घेतला 'बदला'

UP: मारहाण करत पोलिसाची हत्या, 12 तासांच्या आत पोलिसांनी असा घेतला 'बदला'

दारु माफियांवर (Liquor Mafia) कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 10 फेब्रुवारी :  दारु माफियांवर (Liquor Mafia) कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कासगंजमध्ये (Kasganj Encounter)  घडली आहे. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मोतीचा भाऊ एलकार सिंहला ठार मारलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी एलकार सिंहवर अनेक गुन्ह्यांचा आरोप असून तो यापूर्वी अनेकदा जेलमध्ये गेला होता. काय आहे प्रकरण? सिढपुरा पोलीस स्टेशन परिसरातील नगला धीमर गावातील ही घटना आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी अशोक पाल आणि त्यांची टीम गावातील दारु माफियांवर कारवाई करण्यासाठी गेली होती. त्यावेळी दारु माफियांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना बंदी बनवले. यावेळी झालेल्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हे प्रकरण हातळण्यातील पोलिसांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी बिकरुमध्ये झालेल्या घटनेपासून कोणताही बोध न घेता मर्यादीत स्वरुपातील पोलिसांची टीम कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेल्यानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (हे वाचा- चक्क देवाच्या देव्हाऱ्याखाली सापडले तळघर, दारूसाठा पाहून पोलीस झाले हैराण ) या प्रकरणाची माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना पोलीस अधिकारी अशोक पाल हे गावापासून दूर एका शेतामध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळले. तर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह घटनास्थळी सापडला. मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा या प्रकरणात गंभीर जखमी झालेले पोलीस अधिकारी अशोक पाल यांना अलीगढ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या प्रकरणातील आरोपींना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत. (हे वाचा- संतापजनक! धारधार शस्त्राने कुत्र्याची केली हत्या, पोलिसांकडून गुन्हा दाखल) मुख्य आरोपी फरार या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी या परिसरातील गावांमध्ये जोरदार तपास मोहीम सुरु केली आहे. मोती धीमर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो अद्याप फरार आहे. मोतीवर आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल असून अनेक जिल्ह्यांच्या पोलिसांना तो हवा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या