JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लॉकडाऊनदरम्यान मध्यरात्री औरंगाबादमधील हॉटेलवर अज्ञाताचा गोळीबार; परिसरात दहशतीचं वातावरण

लॉकडाऊनदरम्यान मध्यरात्री औरंगाबादमधील हॉटेलवर अज्ञाताचा गोळीबार; परिसरात दहशतीचं वातावरण

Gun Firing at Aurangabad : काल रात्री औरंगाबादमधील एका हॉटेलवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार (Firing at hotel) केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हॉटेल मालकाला धमकावण्यासाठी हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 31 मार्च: सध्या औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर स्मशान शांतता असते. अशा परिस्थितीत काल रात्री औरंगाबादमधील एका हॉटेलवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार (Firing at hotel) केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पडेगाव भागात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हॉटेलच्या दिशेने गोळीबार केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपीने हेल्मेट परिधान केल्याने त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये, त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक अडचणी येत आहेत. पण पोलीस परिसरातील इतरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञांतांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादमधील पेडेगाव भागात हॉटेल मनीष इन हे हॉटेल आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी हॉटेलवर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रात्री या घटनेची परिसरात चर्चा झाली मात्र आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये गोळीबार करणारी व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा - संतापजनक! दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवलं; पतीसमोरच तिघांनी केला बलात्कार हॉटेल मालकाला धमकावण्याच्या उद्देशानं हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त निकेश खटमोडे यांनी व्यक्त केला आहे. संबंधित हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या अधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या