नवी दिल्ली 17 एप्रिल : देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक हत्येची घटना (Murder News) समोर आली आहे. इथे एका मुलानंच आपल्या 70 वर्षाच्या वडिलांची हत्या (Son Killed Father) केली आहे. दोघांमध्ये वादाचं कारण होतं फक्त 50 रुपये. उत्तर दिल्लीतील भरत नगरमधील या बेरोजगार (Jobless) आरोपीनं 50 रुपयांसाठी आपल्या वडिलांची चाकूनं भोकसून निर्घृण हत्या केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेरोजगार आहे आणि तो आपल्या वडिलांकडे पैशाची मागणी करत होता. पीडित व्यक्तीचं नाव महेंद्र पाल असं आहे. ते आपली पत्नी, मुलगी आणि मुलगा अनिलसोबत भारत नगरमध्ये राहात होते. गुरुवारी अनिलनं वडील महेंद्र यांच्याकडे 50 रुपयांची मागणी केली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. Sachin Vaze Case: त्या काडतुसांनी दोघांचा खेळ खल्लास करण्याचा होता वाझेचा प्लॅन पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, 50 रुपये देण्यास नकार दिल्यानं अनिलला राग अनावर झाला आणि तो आपल्या वडिलांसोबत वाद घालू लागला. यानंतर त्याच्या वडिलांना त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली, यामुळे त्याला आणखीच राग आला. यानंतर अनिलनं हातात चाकू घेतला आणि वडिलांच्या छातीवर दोनवेळा चाकूनं वार केले. यानंतर अनिल घटनास्थळावरुन फरार झाला. जखमी महेंद्र पाल यांनी ताबडतोब दीप चंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आरोपीचा तपास सुरू आहे. हत्येसाठी त्यानं चाकूचा उपयोग केला आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.