JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमाचं नाटक करून तरुणीचं लैंगिक शोषण; ब्लॅकमेल करून मित्रांशी संबंध ठेवण्यास दबाव

प्रेमाचं नाटक करून तरुणीचं लैंगिक शोषण; ब्लॅकमेल करून मित्रांशी संबंध ठेवण्यास दबाव

19 वर्षीय पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची तिच्या मैत्रिणीच्या मित्राशी मैत्री झाली आणि हळूहळू दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 8 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातल्या 19 वर्षीय तरुणीबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मित्रांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मध्य प्रदेश राज्यातल्या आगर मालवा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुण हा पीडितेच्या मैत्रिणीचा मित्र होता. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याने पीडितेला प्रेमाच्या खोट्या भूलथापा देऊन हे वाईट कृत्य केलं. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. पीडितेने तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणाने तिच्यासोबत केलेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ चित्रित केला आणि त्यानंतर त्याच्या साह्याने तिला ब्लॅकमेल केल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. त्या व्हिडिओच्या साह्याने ब्लॅकमेल करून तो तिला त्याच्या मित्रांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 19 वर्षीय पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची तिच्या मैत्रिणीच्या मित्राशी मैत्री झाली आणि हळूहळू दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. एके दिवशी तिच्या प्रियकराने तिला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसंच धमकावून त्याने शरीरसंबंधांचा व्हिडिओही चित्रित केला. यानंतर त्या तरुणाने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा -  ‘लव्ह मॅरेज’ केल्यानंतर दिराशी ठेवले अनैतिक संबंध, पतीने चार महिन्यांच्या बाळासह पत्नीला संपवलं धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणाने व्हिडिओचा धाक दाखवून तिच्यावर मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पीडितेने विरोध केल्यावर तिच्या प्रियकराने तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पीडितेने तिच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या आरोपी फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या