प्रातिनिधीक फोटो
रत्नागिरी, 12 जून : आई आणि मुलाचं नात हे जगातील सर्वात आपुलकीचं आणि पवित्र नातं समजलं जातं. या नात्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या अनेक घटनाही वारंवार समोर येतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. वयस्कर आईवर मुलानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई या रक्ताच्या नात्याचा गळा घोटणारी अत्यंत संतापजनक घटना रत्नागिरीतल्या साखर गावात घडली आहे. या गावातल्या एका तरुण मुलाने त्याच्या वृद्ध मातेवर बलात्कार करुन आई या नात्याचा गळा घोटला आहे. 30 वर्षाच्या या विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री आणि पहाटे असा दोन वेळा आपल्या असहाय्य असलेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मातेवर या नराधम मुलाने दोन वेळा बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरला असून या नराधमाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. **हेही वाचा -** पुतण्याने भर रस्त्यात केला काकाचा खून; सोलापूर शहरातील घटनेनं खळबळ जालन्यात मुलाने केला आईचा खून दारुड्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा खून करून स्वतः मामाला फोन करून याची माहिती दिल्याची धक्कादायक जालना जिल्ह्यात शुक्रवारी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यातील लालवाडी शिवारात ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा फरार आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस दारुड्या खुनी मुलाचा शोध घेत आहेत. संपादन - अक्षय शितोळे