JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात, पुण्यात लग्नाचे आमिष देऊन घटस्फोटित महिलेवर बलात्कार

मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात, पुण्यात लग्नाचे आमिष देऊन घटस्फोटित महिलेवर बलात्कार

पीडित महिला ही घटस्फोटित आहे. तिची आणि आरोपीची यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवरून झाली होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 16 ऑगस्ट : राज्यात पुण्यात सातत्याने गुन्हेगारी संबंधित बातम्या समोर येत आहे. एका महिलेची भरदिवसा भोसरीत चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. यानंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यातून गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोव्हेंबर 2021 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधी दरम्यान, काळेवाडी, ताथवडे, वाकड़, जुनी सांगवी येथे या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शैलेश दिपक पवळे (वय 24, रा. पोलीस लाईन बिल्डिंग, वाकड) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोटदुखीच्या नावाने दिली गर्भपाताची गोळी - पीडित महिला ही घटस्फोटित आहे. तिची आणि आरोपीची यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवरून झाली होती. फिर्यादी या घटस्फोटित आहेत हे आरोपीला माहित होते. यानंतर त्याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच काळेवाडी, ताथवडे, वाकड आणि जुनी सांगवी परिसरातील हॉटलेमध्ये त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यातून ही पीडित महिला गर्भवती राहिली. त्यामुळे त्याने पोटदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी खाण्यास देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. हेही वाचा - Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना पुण्यात भरदिवसा महिलेचा खून -  आज भरदिवसा चिंचवडमध्ये एका महिला व्यावसायिकेचा हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. पूजा देवी प्रसाद (वय-32) असे हत्या झालेल्या महिला व्यावसायिकेचे नाव आहे. पुजा हिचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. तिथे आज सकाळी तिची हत्या करण्यात आली. आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडले होते. यानंतर तिने दुकानातील साफसफाई केली. मात्र, काही वेळातच दहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या