JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सिरिअल बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट, शहापूरमधील प्रकाराने खळबळ

सिरिअल बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट, शहापूरमधील प्रकाराने खळबळ

यावेळी त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, एका सिरियलचे शूट आहे. असे सांगत त्यांनी शुटींग चालू केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 7 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आतच शहापूर येथून एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. फिल्म बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट बनवण्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार रात्री 2 वाजता गावकऱ्यांनी उधळून लावला. शहापूर तालुक्यातील लेनाड या गावात दिनांक 6 नोव्हेंबर रोजी फिल्म बनवण्यासाठी डायरेक्टर, निर्माता, कलाकार, जनरेटर व्हान, कॅमेरा, लाईट या सह करोडो रुपयांचे युनिट घेऊन आले होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, एका सिरियलचे शूट आहे. असे सांगत त्यांनी शुटींग चालू केली. मात्र, गावकऱ्यांचा स्वभावाचा वेगळा फायदा घेत त्यांनी रात्री 12 नंतर  ब्लू फिल्म (अश्लील ) शुट चालू केले. काही ग्रामस्थांनी हा सर्व धक्कादायक प्रकार रात्री पाहिला. यानंतर गावातील नागरिकांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन सर्व डाव उधळून लावला. तसेच या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना फोन करून सांगितले. हेही वाचा - घराच्या भिंतीसाठी रक्ताची नाती जीवावर उठली, मोठ्या भावाने वडील आणि लहान भावावर केले चाकूने वार! पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री 2 वाजता 4 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून लॅपटॉप, हार्डडिस्क, व अन्य साहित्य  ताब्यात घेतले आहेत. तर याठिकाणी चार ते पाच जण पळून गेले आहेत. दरम्यान, याठिकाणी आलेल्या वाहनांची हवा काढण्यात आली आहे. तसेच 35 ते 40 जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. या घटनेची अधिक चौकशी वासिंद पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या