पिंपरी चिंचवड, 10 जानेवारी : अवैध धंदे करणाऱ्यांना देवही वाचवू शकत नाही. ही कुठली म्हण नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) प्रत्यक्ष घडलेली ताजी घटना आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैधरित्या दारू विकणाऱ्यांनी तिघांनी चक्क देवाचा आधार घेतला होता. पिंपरी चिंचवड शहरातील आय. टी. पार्क असलेल्या हिंजवडी परिसरात नेऱ्हे दत्तवाडी येथे अवैधरित्या दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार, त्यांनी तात्काळ सापळा रचला आणि संशयित घरावर छापा मारला. मात्र, पूर्ण घर शोधलं तरीही काहीच मिळून न आल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतत होते. बिर्याणी, खिचडी आणि लोणचं! मेन्यू कार्ड नाही तर हे पदार्थ जाणार अंतराळात मात्र, तेवढ्यात एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्याने देवाच्या देव्हाऱ्याखालील हे तळघर शोधलं आणि बघा काय चमत्कार ह्या तळघरातून एक नाही दोन नाही तर तब्बल दोन हजारहून अधिक लिटर गावठी दारूचे बॅरल काढण्यात आले. हे App तुमच्या फोनमध्ये असेल तर लगेच डिलीट करा धक्कादायक बाब म्हणजे, अशा पद्धतीने दारूचा अवैध विक्री करणारे आरोपी पुरुष नसून चक्क तीन स्त्रिया आहेत. पैकी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ज्योती मारवाडी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर आरोपी मारवाडीच्या दोन महिला साथीदारही पोलिसांना मिळून आल्या असून घटनेचा पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी कुंबडे यांनी दिली.