JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बहिणीशी भांडण झालं म्हणून मित्राला घ्यायला बोलावलं, त्याने साधला डाव

बहिणीशी भांडण झालं म्हणून मित्राला घ्यायला बोलावलं, त्याने साधला डाव

पीडित मुलगी ही चोपडा शहरात राहणाऱ्या बहिणीकडे मध्यप्रदेशातून याठिकाणी राहायला आली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 24 ऑगस्ट : जळगावात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बहिणीला सतत घरी भेटायला येणाऱ्या प्रियकराची हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात मागच्या आठवड्यात समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तीन दिवस अत्याचार केल्याची घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेण्यात आले. त्यानंतर मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली. यानंतर संशयित तरुण सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा (रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही चोपडा शहरात राहणाऱ्या बहिणीकडे मध्यप्रदेशातून याठिकाणी राहायला आली होती. मात्र, येथे दोघाबहिणीमध्ये भांडण झाल्याने पीडित मुलीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा यास फोन करुन तिला घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी पिडिता चोपडा शहर बस स्थानकावर आली. यानंतर संशयित आरोपी सचिन याने तिला याठिकाणी येऊन पीडित तरुणीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगितले. तसेच तिला बसने लकडीया (महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेऊन गेला. मित्राकडे चार दिवस राहिले - याठिकाणी एक दिवस राहिल्यानंतर हरियाणा येथील संशयित आरोपी सचिन याचा मित्र राहुल यांच्या घरी ते 4 दिवस राहिले. त्या ठिकाणी आरोपीने पीडितेच्या संमतीविना तिच्यासोबत 3 वेळा शारीरीक संबंध केले. इतकेच नव्हे तर त्यानंतर सेंधवा येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येऊनही आरोपी याने पीडितेसोबत शारीरीक संबंध केले. हेही वाचा -  Murder in Jalgaon : जळगावात हत्यासत्र सुरूच, मागच्या चार दिवसात जिल्ह्यात तीन खून याप्रकरणी पीडितेने मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील वरला पोलीस ठाण्यात 6 ऑगस्टला घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. याबाबतची गुन्ह्याची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयामार्फतीने आज रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या