राहुल पाटील (मुंबई), 14 डिसेंबर : पालघरमधील वाडा तालुक्यातील बीलोशी येथील रेग्झीन या कंपनीत रिऍक्टर टॅंक साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (दि.14) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सचिन भोईर आणि सचिन करले या दोन कामगारांचा मृत्यू झाला असून या मृत्यूनंतर वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिऍक्टर टॅंक साफ करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या या दोन्ही मयत कामगारांसाठी कंपनीकडून सुरक्षिततेची कुठलीही खबरदारी घेतली नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेमुळे पालघरमधील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : श्रद्धाप्रमाणे मुलाने बापाच्या मृतदेहाचे केले 32 तुकडे, भयंकर घटनेनं देश हादरला
पालघर मधील औद्योगिक वसाहतीत कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या कडे एमआयडीसी आणि सेफ्टी इन्स्पेक्टर दुर्लक्ष करत असल्याच वारंवार चित्र समोर येतंय . मात्र अनेक कामगारांचा जीव गेल्यानंतरही या संबंधित विभागांना जाग येत नसल्याने कामगारांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धुळ्यातही असाच प्रकार
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच सहकाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये धातूचे कण साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रेशर पंप घातला. या घटनेत अंतर्गत दुखापत झाल्यानं पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साक्री तालुक्याच्या निजामपूरमधील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा : आधी प्रेम, मग प्रेग्नेन्ट… गर्लफ्रेंड ऐकली नाही म्हणून थेट कहाणीचा The End, नक्की असं काय घडलं?
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवार दुपारी साक्री तालुक्यातील निजामपूरमध्ये घडली आहे. आरोपी आणि मृत्यू झालेला कर्मचारी हे दोघेही निजामपूरमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. ही कंपनी धातू कामाशी संबंधित सेवा पुरवते. या कंपनीतील कर्मचारी हे आपल्या कपड्यावर जमा झालेले धातुचे कण साफ करण्यासाठी हाय प्रेशर पंपचा वापर करतात.