JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! वडिलांनी 9 महिन्यांच्या चिमुकलीची पाण्याच्या ड्राममध्ये बुडवून केली हत्या

धक्कादायक! वडिलांनी 9 महिन्यांच्या चिमुकलीची पाण्याच्या ड्राममध्ये बुडवून केली हत्या

आधी 9 महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं आणि नंतर वडिलांनी केली आत्महत्या

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 17 जुलै: 9 महिन्यांच्या चिमुकलीची पाण्याच्या ड्राममध्ये बुडवून वडिलांनीच जीवे मारल्याची धक्कादायक घटना नागपुरातील भांडेप्लॉट चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबड उडाली. चौकातील शंकर शाही मठाजवळ ड्रममध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला तर चिमुकलीच्या हत्येनंतर आरोपीनं बियरच्या बाटलीनं स्वत:चा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. 32 वर्षीय सोनू इसराईल शेख हा शंकर शाही मठाजवळ राहातो. तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. गुरुवारी सोनूनं आपल्या 9 महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत: बिअरच्या बाटलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेत असतानाचा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या सोनूवर उपचार सुरू आहेत. हे वाचा- चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केला हट्टा, 7 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू हा चालकाचं काम करतो. कौटुंबिक कलहातून त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याच्या ड्राममध्ये बुडल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून बिअरची बाटली चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान आरोपी सोनूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या