मुंबई 22 सप्टेंबर: मुंबईत रोजच कुठे ना कुठे सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात. यामुळे पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत. असं असताना दहिसर पोलिसांनी 12 वर्षांपासून असे गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक केली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. त्याला या चोरीमधे मदत करणाऱ्या त्याची पत्नी, मेव्हुणे आणि मित्राला सुद्धा अटक करण्यात यश आलं आहे. त्याला मकोका कायद्या अंतर्गत अटक केली आहे. आरोपीने आतापर्यंत मुंबई सह ठाणे, नवी मुंबई, वसई विरार या ठिकाणी अशा प्रकारचे 108 गुन्हे केल्याची माहिती दहिसरचे पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला आहेत. आरोपी हा वांद्र्याच्या रिक्लेमेशनच्या झोपडपट्टीत राहतो. तो बजाज पल्सर या चोरलेल्या दुचाकींचा वापर करत होता. ही मोटारसायकल त्याने कुर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीबी नगर परिसरातून चोरली होती. 2020 साल कसं वाटतंय? शब्दांतून नाही तर नव्या EMOJI तून सांगा तुमचा MOOD साजिद हा 2008 पासून चेन स्नॅचिंग करीत होते. त्याला ठाण्याच्या चितळसर पोलिसांनी अटक केली होती आणि तुरुंगात टाकले होते पण जामीन मिळाल्यानंतर तो उत्तर मुंबईत अधिक सक्रिय झाला. दहिसर पोलिसांनी मालवणी येथून 34 वर्षीय आतिफ मोबिल अन्सारीला सीसीटीव्हीच्या मदतीने अटक करण्यात यश मिळविले होते. साखळी चोरीच्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होतं. पोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साजिदची पत्नी समीम आणि मेहुणे आरिफ यांना 86 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली. जामिनावर त्याला न्यायालयाने सोडले होते परंतु शंभरहून अधिक प्रकरणांमुळे पुन्हा साजिदला मकोकाअंतर्गत अटक करण्यात आली.