JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मॉब लिंचिंगने देश पुन्हा हादरला! तरुणाला रात्रभर मारहाण; सकाळी मृत्यू

मॉब लिंचिंगने देश पुन्हा हादरला! तरुणाला रात्रभर मारहाण; सकाळी मृत्यू

Mob Lynching Case: ट्रक चोरीच्या आरोपातील एका तरुणाला (accused in truck theft) काही जणांनी रात्रभर बांधून बेदम मारहाण (bind and beating full night) केली आहे. यामध्ये संबंधित तरुणाचा सकाळी उपचार घेताना रुग्णालयात मृत्यू (Death) झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 08 मार्च: गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील पालघरजवळील एका गावात काही नागरिकांनी मिळून दोन साधूंची हत्या केली होती. याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. हे साधू चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. या संशयातूनच दोन साधूंची हत्या (Murder) करण्यात आली होती. आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ट्रक चोरीच्या आरोपातील एका तरुणाला (accused in truck theft) काही जणांनी रात्रभर बांधून बेदम मारहाण (bind and beating full night) केली आहे. यामध्ये संबंधित तरुणाचा सकाळी उपचार घेताना रुग्णालयात मृत्यू (Death) झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार झारखंडची राजधानी रांची येथे घडला आहे. येथील एका युवकाला ट्रक चोरी प्रकरणात रात्रभर बांधून मारहाण करण्यात आली आहे. या बेदम मारहाणीमुळे आरोपी युवकाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. मृत्यूची घटना समोर येताच संतप्त लोकांनी रांचीच्या पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. या घटनेमुळं देशातील मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनांची पुन्हा आठवण झाली आहे. या मॉब लिंचिंगमध्ये मृत पावलेल्या तरुणाचं नाव सचिन कुमार असून तो नवाटोली येथील रहिवाशी होता. रांचीच्या अपर बाजारात रात्री एक ट्रक उभा होता, ज्याची चोरी झाली आहे. या प्रकरणात सचिनवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अपर बाजारात राहणाऱ्या काही मजुरांनी कायदा हातात घेवून सचिनला रात्रभर बांधून मारहाण केली आहे. नंतर सकाळी सचिनवर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. हे ही वाचा - पालघर हत्याकांड : साधूंची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू; सुरू झाला नवा वाद सचिन कुमारच्या मृत्यूची बातमी समोर येताच गावातील लोकांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी आणि कुटुंबीयांनी मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. संतापलेल्या लोकांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत लवकरात लवकर त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. सचिनला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सचिनचा मृत्यू पोलीस स्टेशनमध्येच झाला असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या मते, सचिनचा मृत्यू उपचारादरम्यान रुग्णालयात झाला आहे. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलून कारवाई केली असती, तर सचिनचा जीव वाचला असता, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या