JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / जोशात बसला मोठा फटका! 70 रुपयांचं कंडोम पडलं 3 लाखाला

जोशात बसला मोठा फटका! 70 रुपयांचं कंडोम पडलं 3 लाखाला

Crime News: एका व्यक्तीला 70 रुपयांचं कंडोम खरेदी करणं चांगलचं महागात पडलं आहे. कंडोम खरेदी करण्याच्या नादात त्याला 3 लाख रुपयांचा गंडा बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भागलपूर, 26 फेब्रुवारी : एका व्यक्तीला 70 रुपयांचं कंडोम (Condom) खरेदी करणं खूपच महागात पडलं आहे. पीडित व्यक्तीने कंडोम खरेदी करण्यासाठी एका मेडिकल समोर स्कुटी उभी केली. यावेळी त्याने स्कुटीची चावी गाडीला तशीच ठेवली. यादरम्यान कोणीतरी त्याच्या गाडी चालवत असल्याचं दाखवून डिक्कीतील 3 लाख रुपये लंपास (Theft) केले. आणि चावी तशीच गाडीला सोडून पोबारा केला आहे. गाडीच्या डिक्कीला लावलेली चावी पाहून पीडित व्यक्तीला धक्काच बसला आहे. त्यानंतर त्याने डिक्की उघडून पाहिलं तेव्हा सर्व पैसे लंपास झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित व्यक्तीने फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पीडित एक नौदल कर्मचारी असून तो भागलपूर येथील बबरगंज येथील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने एका पोस्ट ऑफिसमधून 3 लाख 10 हजार रूपये काढले आणि सर्व पैसे गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर तो घराच्या दिशेने प्रवास करू लागला. दरम्यान त्याने एका ठिकाणी थांबून दोन कच्चे नारळ विकत घेतले आणि ते डिक्कीत ठेवले. यावेळी डिक्कीत पैसे होते. त्यानंतर त्याने रस्त्यातील एका मेडीकलजवळ कंडोम घेण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी त्यांनी गाडीची चावी तशीच गाडीला ठेवली. हे ही वाचा- पत्नीला असं काही भयानक करण्यास भाग पाडलं की,न्यायालयानं सुनावली सात वर्षांची कैद तो रस्त्यावरील महावीर मेडीकल हॉलमधून कंडोम खरेदी करून परत येईपर्यंत कोणीतरी त्याचे डिक्कीत ठेवलेले सर्व पैसे लंपास केले आहेत. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून प्रकरणाचा तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या