JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 21 वर्षांच्या मुलाला संपवलं, भर बाजारात चौघांनी चाकूने भोसकलं, कल्याणमध्ये खळबळ

21 वर्षांच्या मुलाला संपवलं, भर बाजारात चौघांनी चाकूने भोसकलं, कल्याणमध्ये खळबळ

21 वर्षांच्या युवकाची भर बाजारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 8 जानेवारी : 21 वर्षांच्या युवकाची भर बाजारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. चार जणांनी या मुलाची भर बाजारात हल्ला केला. महिलेशी संबंध तोडल्यामुळे आणि पुन्हा तिच्यासोबत मैत्री केल्यामुळे या प्रकरणातला मुख्य आरोपी नाराज झाला होता. ही संपूर्ण घटना शनिवारी घडली. 19 वर्षांची महिला आणि तरुण कल्याणच्या खाडेगोलावाडी बाजारात गेले होते. ‘युवकाचा खून करणारा मुख्य आरोपी अन्य तिघांसह आला होता. या चौघांनी मिळून त्याच्यावर चाकूने अनेक वार केले, यानंतर चौघंही तिथून फरार झाले,’ अशी माहिती मुलीने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला दिली आहे. चाकूचे वार झाल्यानंतर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. थंडीपासून बचावासाठी झोपताना जाळलं पेट्रोमॅक्स, नंतर कुटुंब उठलंच नाही, घरात घडलं भयानक युवकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे, तसंच पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी आणि इतर तिघांवर कलम 302 (हत्या) आणि 34 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या