मथुरा, 24 सप्टेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मथुरेतील जमुनापार पोलिस ठाणे परिसरातून समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - याठिकाणी एका विवाहित महिलेची परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटले आणि नंतर आरोपी तरुणाने विवाहितेला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर जमुनापार भागातील विवाहित महिलेनेही न्यायासाठी एसएसपी कार्यालय गाठले आणि याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीला अटक न केल्याने विवाहित महिला त्रासली आहे. तसेच तिला आरोपीच्या अटकेसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. या महिलेचा आरोप केला आहे की, ती गावातील एका तरुणाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेटली. शेजारच्या तरुणाची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि त्यानंतर शेजारच्या तरुणाने महिलेचा नंबर त्याच्या मित्राला दिला. त्यानंतर विवाहितेचे त्या तरुणासोबत संभाषण झाले. संभाषणानंतर तरुणाने महिलेची भेट घेतली. या भेटीत त्याने प्रेम व्यक्त करून त्याने त्या महिलेला आपल्या वासनेची शिकार बनवले. तरुणाने दारू पिऊन दोनदा बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, अजून आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे पीडित महिला निराश असून न्याय मिळवण्यासाठी आता ती एसएसपी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे. हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यानंतर विवाहित तरुणीचं टोकाचं पाऊल, आईने मुलीच्या प्रियकरावर लावला हा आरोप Instagram वर स्केच आर्टिस्टसोबत झाली मैत्री अन्… दिल्ली विद्यापीठाच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने उत्तर दिल्लीतील सायबर पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने सांगितले होते की, फेब्रुवारी 2022 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोहम्मद तंजीमसोबत तिची मैत्री झाली होती. तंजीमचे स्केच बनवण्याचे कौशल्य आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मोठ्या संख्येने फॉलोअर्स पाहून ती प्रभावित झाली, त्यानंतर पीडितेने त्याच्याशी चॅटिंग सुरू केले. यानंतर काही वेळानंतर आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेने तिच्यासोबतचे तिचे खासगी फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले, काही दिवसांनी पीडित मुलगी पहिल्यांदाच आरोपीला भेटली. या भेटीदरम्यान पीडितेने आरोपीचा फोन तपासला त्यात आरोपीने तिचा अश्लील फोटो गुगल ड्राइव्हमध्ये ठेवल्याचे तिला दिसले. पीडितेने तिचा फोन तपासला असता, तिच्या फोनमध्ये इतर अनेक मुलींचे व्हिडिओ आणि फोटो सापडले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आरोपी मोहम्मद तंजीमसोबतचे संबंध संपवण्याबाबत बोलली. मात्र, आरोपीने पीडितेचे खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार केली.