राजस्थान, २० ऑक्टोबर : भारतात (India) तिहेरी तलाकला (Triple Talaq Ban) कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही मुस्लिम (Muslim) पुरुषाने आपल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट (Divorce) दिला तर त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते. सरकारने तिहेरी तलाकला बंदी घातली असली तरी अनेक ठिकाणी पतीने पत्नीला तलाक दिल्याची प्रकरणं घडत आहेत. काही महिला याविरोधात पोलिसांत (Police) तक्रार देतात, तर काही मुकाट्याने त्रास सहन करतात. असंच एक तिहेरी तलाकचं प्रकरण राजस्थानमधून (Rajasthan) समोर आलं आहे. राजस्थानमधील बांसवाडा शहरात एका मुस्लिम पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला तसेच मारहाणही केली. तीन वेळा तलाक म्हणत पतीने पत्नीला भर रस्त्यात तलाक दिला. त्यानंतर दुचाकीने तिला धडक देऊन खाली पाडलं. या घटनेत महिलेच्या पायाला जखमा (Injury) झाल्या असून ती गंभीर जखमी झाली आहे. पतीच्या दुसऱ्या पत्नीनेही मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विशेष म्हणजे महिलेने पाच दिवसांपूर्वी पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. हे तिहेरी तलाकचं प्रकरण राजा तालाब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं. दाहोद रोडवरील इंदिरानगरच्या एकजान कॉलनीत राहणाऱ्या रिझवान अहमद शाद याने पत्नी परवीन हिला ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणत घटस्फोट दिला. नंतर तिला तीन वेळा धक्का दिला. यानंतर तिला दुचाकीने धडक दिली आणि पळून गेला. या प्रकरणी माहिती मिळताच महिला ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी परवीनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परवीनच्या पायावर गंभीर जखमा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडिता परवीनने आरोप केला आहे की, तिचं आणि रिझवानचं 28 डिसेंबर 2021 रोजी लग्न झालं होतं. लग्नाच्या 8 दिवसानंतर पती आणि सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी (Dowry) तिचा छळ सुरू झाला. यानंतर पीडिता कुपडा येथील तिच्या माहेरी राहू लागली. याचदरम्यान तिचा पती रिझवानने रतलाम येथील एका मुलीसोबत दुसरं लग्नही केलं. पतीच्या दुसऱ्या पत्नीनेही तिच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शाब्दिक वादानंतर हाणामारी झाल्याचं तिने सांगितलं. महिला पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी पीडित परवीनने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे. ़