JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत; CCTV व्हिडीओ समोर

मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत; CCTV व्हिडीओ समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात

मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांची तलवार-काठ्या घेऊन दहशत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली आहे. काही गुंडांनी तलवारी घेऊन एका हॉटेलमध्ये हैदोस घातला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काय आहे प्रकरण? ठाणे शहरातील लोकमान्य नगर परीसरातील एका हॉटेलमध्ये आज काही गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तोंडाला रुमाल बांधून हातात तलवार आणि काठ्या घेवुन त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना या गुंडानी मारहाण केली. तोडफोडीचे कारण समजले नाही. दहशत माजवण्याकरता तोडफोड केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या शहरातच घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

ठाण्यात दहशत माजविणारे गुंड स्थानबद्ध मागच्या महिन्यात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारा कुप्रसिद्ध गुंड सुकेश ऊर्फ भोला अमोल झा याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करीत त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. दहशतमुक्त परिसर करण्यासाठी आतापर्यंत 15 गुंडांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाचा - रात्री बाईकवरुन कामावर निघाला अन् सकाळी मृतदेह परतला घरी आरोपी कुप्रसिद्ध गुंड सुकेश ऊर्फ भोला अमोल झा (30) रा. जीवनदीप चाळ, साई मंदिराच्या बाजूला, घोलाई नगर, कळवा पूर्व याच्याविरोधात गंभीर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, मारामारी, सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणे, महिलांविरुद्ध अत्याचार, अवैध शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद कळवा पोलिस ठाण्यात आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध ठाण्यांत पोलिस अभिलेखावर असलेले गुन्हेगार आणि सराईत यांच्या गुन्ह्यांना आळा घालण्याची मोहीम आयुक्तालयाच्या वतीने राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत 15 गुंडांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करीत गुंडांना कारागृहाचा रस्ता दाखवला आहे. अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या