गांधीनगर, 21 फेब्रुवारी : आई (mother) आणि तिच्या अपत्याचं (child) नातं खूप पवित्र आणि महान असल्याचं बोललं जातं. या नात्याला निष्पाप मुलापासून दूर नेणारी दुर्दैवी घटना गुजरातच्या गांधीनगर (Gujrat Gandhinagar) इथं शनिवारी (20 फेब्रुवारी) घडली. गुजरातच्या गांधीनगर इथं घडलेल्या या घटनेनं परिसरातले लोक हळहळत आहेत. अडालज-अंबापूर रस्त्यावर एक कचरावेचक महिला (Garbage picker woman) अचानक मृत्युमुखी (died) पडली. त्यावेळी तिच्यासोबत तिचा पाच वर्षांचा मुलगा होता. (small child) अत्यंत निष्पाप अजाण असलेल्या त्या बालकाला काय करावं कळालं नाही. काही वेळ गेल्यानंतर ते बाळ रडू लागलं. आसपासच्या तिथून ये-जा करणाऱ्या लोकांचं (passer by) रडणाऱ्या बाळावर आणि निष्प्राण पडलेल्या आईकडे लक्ष गेलं. लोकांना महिला काहीच हालचाल करत नाही हे पाहून संशय आला. त्यांनी पडताळून पाहिल्यावर महिलेचा मृत्यू (dead) झाल्याचं लक्षात आलं. याबाबत पोलिसांना कळवलं गेलं. पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी (postmortem) पाठवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर इथल्या अडालज शनिदेव मंदिराजवळ कष्टकरी दांपत्य रामनाथ जोगी आणि मंजू देवी तीन मुलांसोबत राहायचे. रामनाथ सकाळी कामावर गेले. हेही वाचा तीन वर्षांपूर्वी झालं होतं अपहरण, सापडली तेव्हा झालेली दोन मुलांची आई मंजू पाच वर्षाच्या मुलाला सोबत घेत कचरा वेचायला बाहेर निघाली. यादरम्यानच मंजुची तब्येत बिघडली. ती रस्त्याच्या कडेला चक्कर येत पडली. मुलगा खूप वेळ तसाच काही न कळून आईच्या प्रेताजवळ (dead body) बसून राहिला. काही लोकांना संशय आल्यानं ते थांबले आणि त्यांनी महिलेला आवाज दिला, हलवलं. मात्र काहीच हालचाल दिसली नाही. त्यानंतर पोलिसांना कळवलं गेलं.