JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक

राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक

राकेश रोशन यांच्यावर जानेवारी 2000 मध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथील कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी राकेश रोशन यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. यात दोन गोळ्या या रोशन यांना लागल्या होत्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 10 ऑक्टोबर : निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावरील गोळीबार प्रकरणासह 11 खून आणि 7 खुनाच्या प्रयत्नातील कुख्यात गँगस्टर सुनील विश्वनाथ गायकवाड याला अखेर ठाणे पोलिसांनी जेरबंद केले आहे.  गेल्या तीन महिन्यांपासून सुनील गायकवाड हा फरार होता. पण, अखेर पोलिसांनी मोठ्या हिंमतीने या गँगस्टरला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. सुनील विश्वनाथ गायकवाडला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. सुनील गायकवाड हा नाशिक मध्यवर्ती कारागृह पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर तो कारागृहात परतलाच नव्हता. गेल्या 3 महिन्यांपासून सुनील गायकवाडचा शोध सुरू होता. अखेर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा कळव्यातील पारसिक बोगदा परिसरात येणार आहे, असं कळलं. त्यानुसार, पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि सुनीलला ताब्यात घेतले. सुनीलच्या विरोधात 11 खून आणि  7  खुनाच्या प्रयत्न असे गुन्हे दाखल आहे. यात 2000 साली दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही सुनील सहभागी होता. राकेश रोशन यांच्यावर जानेवारी 2000 मध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथील कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी राकेश रोशन यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. यात दोन गोळ्या या रोशन यांना लागल्या होत्या. सुनील गायकवाड याला खुनाच्या प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या मध्यावर्ती कारागृहात सुनील आपली शिक्षा भोगत होता. परंतु, लॉकडाउनच्या काळात 26 जून रोजी सुनील हा 28 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल संपल्यानंतर सुनीलने कारागृहात हजर होणे गरजेचं होतं. पण, तो फरार झाला. अखेर तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. लज्जास्पद! बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्या, दलित महिलेला मात्र जमिनीवर बसवलं सुनील हा 1999 आणि 2000 मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय होता. तो अली बुदेश आणि सुभाष सिंह ठाकुरच्या गँगमध्ये सामील झाला होता. याच काळात नाशिकमध्ये झालेल्या दरोड्यामध्येही सुनील सहभागी होता. या दरोड्यात सुनीलनने पोलिसांवरही गोळीबार केला होता. अखेर सुनीलला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या