JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / उपचारादरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू; डॉक्टरांना लोखंडी रॉडनं मारहाण

उपचारादरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा मृत्यू; डॉक्टरांना लोखंडी रॉडनं मारहाण

रुग्णावर उपचार करण्यावरुन रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये अक्षरशः मारहाण झाली आहे. याचवेळी उपचारादरम्यान पोलीस निरीक्षकाच्या (Police Inspector) आईचा मृत्यू (Corona Patient’s Death) झाला आहे.

जाहिरात

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रयागराज 23 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारांसाठीही रुग्णांना वाट पाहावी लागत असल्याची स्थिती आहे. अशात आता प्रयागराजमधील स्वरूप रानी नेहरू या कोविड रुग्णालयात (Covid Hospital) रुग्णाला दाखल करण्याच्या मुद्द्यावरुन मोठा वाद झाला आहे. रुग्णावर उपचार करण्यावरुन रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये अक्षरशः मारहाण झाली आहे. याचवेळी उपचारादरम्यान पोलीस निरीक्षकाच्या (Police Inspector) आईचा मृत्यू (Corona Patient’s Death) झाला आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक आपल्या कोरोनाबाधित आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांनी ज्यूनिअर डॉक्टरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही गटांमध्ये मारहाणही झाली. घटनेनंतर नाराज झालेले ज्यूनिअर डॉक्टर धरण्यावर बसले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. नंतर घटनास्थळी डीएम दाखल झाले आणि डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या संपानंतर रुग्णालयात दाखल रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. Bhandup Fire Exclusive:…तर त्या 11 जणांचे प्राण वाचले असते,आगीचं कारण आलं समोर डॉक्टरांनी असा आरोप केला आहे की संबंधित पोलिसानं आणि त्यांच्या नातेवाईकांनी ड्यूटीवर असणाऱ्या डॉक्टरांवर लोखंडी रॉडनं हल्ला केला आहे. यामध्ये अनेक डॉक्टर जखमी झाले आहेत. तर, मारहाणीच्या घटनेत पोलिसासहीत त्यांचे नातेवाईकही गंभीर जखमी झाले आहेत. प्रतापगड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकाच्या पदावर असणाऱ्या जुल्फिकार अली आपल्या आईला घेऊन कोविड-19 लेवल थ्री एसआरएन रुग्णालयात पोहोचले. कोविड वॉर्ड नंबर 2 मध्ये तैनात डॉक्टरांनी बेड खाली नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला. डॉक्टरांनी असा आरोप केला, की याच कारणामुळे नाराज झालेल्या पोलीस निरीक्षकांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सलाइनच्या स्टॅन्डनं मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी असाही आरोप केला, की तिथे उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही आमचा बचाव केला नाही. यानंतर डॉक्टरांनीही पोलिसाला आणि नातेवाईकांना मारहाण केली. यानंतर पोलीस जुल्फिकर जखमी अवस्थेत जमिनीवर पडून राहिले. डॉक्टरांनी आपल्याला आणि नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसानं केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या