छिंदवाडा, 31 डिसेंबर : तेलही गेल तूप गेलं हाती मात्र धुपाटणं आलं अशी गत तरुणाची झाली. संपत्तीसाठी वारंवार त्रास देणाऱ्या मुलाला शेतकरी असलेल्या वडिलांनी चांगलीच अद्दल घडवली. मुलाच्या वागण्याला वैतागून या शेतकऱ्यानं आपल्या संपत्तीचा अर्धा हिस्सा पत्नीच्या तर अर्धा हिस्सा श्वानाच्या नावे केला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाड्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे कंटाळलेल्या एका शेतक्याने आपल्या संपत्तीमधला अर्धा हिस्सा श्वान जॅकीकडे तर अर्धा पत्नी आपली पत्नी चंपाच्या नावावर केला आहे. शेतकऱ्याच्या या निर्णयामुळे गावाकऱ्यांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या आहेत. बारीबाडा गावात राहणारा शेतकरी ओम नारायण यांनी आपल्या श्वानावर असलेली निष्ठा दाखवत आपल्या मालमत्तेतील अर्धा हिस्सा त्याच्यानावे केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओम नारायण यांच्यासोबत त्यांची मुलं नीट वागत नव्हते. मुलांच्या जाचाला वैतागून अखेर त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी केली. हे वाचा- कठुआमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला, दहशतवाद्यांचं लक्ष्य चुकल्याने अनर्थ टळला मुलांनी संपत्तीवरून लावलेला तगदा सोडवण्यासाठी त्यांनी अखेर आपल्या मालमत्तेची वाटणी केली आणि मुलांचा हिस्सा श्वानाच्या नावे केला आहे. त्यांनी मृत्यूपत्रात याबाबत नमूद केलं आहे. माझ्या पश्चात माझ्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा श्वानाच्या नावे करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची सेवा करणारे त्याचे वारसदार होतील असंही ओम नारायण यांनी त्यामध्ये नमूद केलं आहे. शेतकरी ओम नारायण यांनी कौटुंबीक वादाला कंटाळून 2 एकर जमीन श्वानाच्या नावे केली आहे. या श्वानाचं पालन पोषण करणारा व्यक्ती त्याच्या पश्चात या जमिनीचा वारसदार असेल असंही या मृत्यूपत्रात नमूद करण्यात आलं आहे.