JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / थंडीपासून बचावासाठी झोपताना जाळलं पेट्रोमॅक्स, नंतर कुटुंब उठलंच नाही, घरात घडलं भयानक

थंडीपासून बचावासाठी झोपताना जाळलं पेट्रोमॅक्स, नंतर कुटुंब उठलंच नाही, घरात घडलं भयानक

देशभरामध्ये थंडीची लाट पसरली आहे, यापासून बचावासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत, पण यातलाच एक उपाय एका कुटुंबाच्या जीवावर बेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सीतापूर, 8 जानेवारी : देशभरामध्ये थंडीची लाट पसरली आहे, यापासून बचावासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत, पण यातलाच एक उपाय एका कुटुंबाच्या जीवावर बेतला आहे. थंडीपासून बचावासाठी पेट्रोमॅक्स जाळण्यात आलं. या पेट्रोमॅक्समधून आलेल्या विषारी गॅसमुळे नवरा-बायको आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वथाना क्षेत्राच्या झज्जर भागात मदरसा शिक्षक आसिफ त्याची पत्नी शगुफ्ता आणि त्यांची मुलं जैद आणि मायरा राहत होते. या चौघांची पार्थिव रविवारी सकाळी त्यांच्या घरातल्या बिछान्यावर मिळाली. मदरसा शिक्षक असलेल्या आसिफचं वय 32, त्याची पत्नी शगुफ्ताचं वय 30 आणि त्यांची दोन मुलं जैदचं वय 3 आणि मायरचं वय 2 वर्ष होतं. आसिफ आणि त्यांचं कुटुंब शनिवारी रात्री जास्त थंडी असल्यामुळे खोलीत गॅसचं पेट्रोमॅक्स लावून झोपले. पेट्रोमॅक्समधून निघालेल्या गॅसमुळे श्वास गुदमरला आणि संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. सकाळी दूधवाल्याने दरवाजा वाजवला तेव्हा आतून कोणीही दार उघडलं नाही. यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि त्यांना आतमध्ये आसिफ, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या