JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / झोपेअभावी MTNL चे माजी अधिकारी त्रस्त; कुटुंबीय घरात असताना 16 व्या मजल्यावरुन मारली उडी

झोपेअभावी MTNL चे माजी अधिकारी त्रस्त; कुटुंबीय घरात असताना 16 व्या मजल्यावरुन मारली उडी

माजी अधिकाऱ्याचा या दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याने 16 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचं नाव विनोद शंकर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही घटना नोएडा येथील पंचशील वेलिंगटन सोसायटीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय विनोद शंकर MTNL मधून अधिकारी पदावरुन निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबासह एकत्रतच राहत होते. याचदरम्यान विनोद यांनी 16 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. रात्री गार्डला काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला. यानंतर गार्ड तातडीने आवाजाच्या दिशेने गेला. तर तेथे विनोद रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले होते. गार्डने या प्रकरणात तत्काळ पोलिसांना माहिती दिली. विनोद शंकर एमटीएनएलमधून सीनियर सुपरवायजर पदावरुन निवृत्त झाले होते. विनोद शंकर यांच्या मुलाने पोलिसांना सांगितलं की, गेल्या एक महिन्यापासून ते झोप येत नसल्यामुळे त्रस्त होते. धक्कादायक! ऑनलाईन रमीच्या व्यसनात गमावले पैसे, पुण्यात नैराश्यातून युवकाची आत्महत्या त्यांनी पुढे सांगितलं की, विनोद रात्री उशिरा फ्लॅटच्या बाल्कनीत फिरत असत. गेल्या काही महिन्यापासून ते तणावात होते. यामुळे त्यांना रात्रीची झोपही येत नव्हती. तणाव आणि झोप येत नसल्यामुळे त्यांनी 16 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या