JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / शाळा-कॉलेजमध्ये Food App वरून पोहोचवायचे ड्रग्स, 8 तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शाळा-कॉलेजमध्ये Food App वरून पोहोचवायचे ड्रग्स, 8 तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अल्पवयीन आणि तरुणांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढत आहे. यामागचे असणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडण्यासाठी सापळा रचला आणि धक्कादायक सत्य समोर आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली : अल्पवयीन आणि तरुणांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढत आहे. यामागचे असणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडण्यासाठी सापळा रचला आणि धक्कादायक सत्य समोर आलं. विद्यार्थी शाळा आणि कॉलेजमध्ये फूड डिलिव्हरी अॅपच्या मध्यमातून ड्रग्स मागवत असल्याचं लक्षात आलं. तरुणांमध्ये ड्रग्जची वाढती क्रेझ पाहता देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने छापा टाकून अमली पदार्थांची तस्करी पकडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवायचे. आरोपी विद्यार्थी विशिष्ट टोळ्या, शाळा, महाविद्यालये, संस्था, व्यवस्थापन महाविद्यालयांना टार्गेट करतात. यासाठी विशिष्ट कुरिअरचा वापर देखील केला जातो. एकदा का अंमली पदार्थांची सवय लागली की रोज हे विद्यार्थी ऑर्डर देऊ लागतात. दिल्ली पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने या प्रकरणी सापळा रचून कारवाई केली. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात पकडलेल्या तरुणांमध्ये बीबीए, बीटेक ड्रॉप आऊट आणि फॅशन इंजिनीअरचा समावेश आहे. आयआयटी ड्रॉप आउट असलेले विद्यार्थी देखील यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही साखळी अजून किती लांब आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. जप्त करण्यात आलेल्या सगळ्या ड्रग्सच्या किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या