JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टर, इंजिनियर तरुणांकडून धक्कादायक कृत्य; छापा मारताच पोलीसही चक्रावले

डॉक्टर, इंजिनियर तरुणांकडून धक्कादायक कृत्य; छापा मारताच पोलीसही चक्रावले

उच्चशिक्षित तरुणही अनेकदा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचं दिसतं. ग्वालेरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी : जुगाराचं व्यसन लागलेले लोक कुटुंबासह समाजासाठीही डोकेदुखी बनतात. पोलीस छापे टाकून या जुगारींना पकडत असतात. नुकताच मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जुगारींवर छापा पडला. मात्र या जुगारींबाबत कळताच पोलिसांना मोठंच आश्चर्य वाटलं. मध्य प्रदेशात ग्वालियरमध्ये (Gwalior) पुरानी छावणी भागात ही घटना घडली. पोलिसांना शनिवारी या भागात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलीस या भागातील शेतात गेले. तिथं बरेच लोक जुगार खेळत बसले होते. यापैकी चार जुगारी तरुणांना पोलिसांनी पकडलं (youth caught gambling) . त्यातील 20 होऊन अधिक लोक पळून गेले. या ठिकाणी 43 हजार 500 रुपये सापडले. चार लोक पकडले गेले तशी त्यांची ओळख पटवण्यात आली. यातला एकजण व्यवसायानं डॉक्टर असल्याचं कळताच पोलीस एकदमच आश्चर्यचकित झाले. हा डॉक्टर (Doctor) एका खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) काम करतो. दुसरा त्याच हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक आहे. तिसरा आरोपी ट्रान्सपोर्टर आणि चौथा चक्क इंजिनियर (Engineer) आहे. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपींना जामीन (Bail) मिळाला आहे. हे ही वाचा- पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर कमेंट करणं विराट कोहलीला पडलं महागात; नेमकं काय झालं पुराणी छावणी पोलीस ठाण्याचा प्रभार सांभाळणारे अधिकारी सुधीर सिंह कुशवाह म्हणाले, शनिवारी संध्याकाळी आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती. जिगसोली गावात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो आहे. ग्वालियर शहरातल्या लोकांसह आसपासच्या गावातीलही लोक यात सहभागी असल्याचं कळालं होतं. पोलीस घटनास्थळावर गेले तसं त्यांना पाहून जुगार खेळणारे लोक पळून जायला लागले. यातल्या चार लोकांना पकडलं गेलं. घटनास्थळावर पत्ते आणि 43 हजार 500 रुपये रोख मिळाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या