JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Mumbai : कॅनरा बँकेतून 428 कोटींचं लोन; कंपनीच्या डायरेक्टरच्या ऑफिसात आढळलं घबाड, CBI अधिकारीही हादरले!

Mumbai : कॅनरा बँकेतून 428 कोटींचं लोन; कंपनीच्या डायरेक्टरच्या ऑफिसात आढळलं घबाड, CBI अधिकारीही हादरले!

पीएसएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने आज मुंबईत मोठा छापा टाकला.

जाहिरात

जप्त केलेली रोख रक्कम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने पीएसएल स्कॅम घोटाळ्यात मुंबईत छापे टाकले. या छापेमारीदरम्यान, त्यांना 1 लाख यूएस डॉलर आणि 2 कोटी रुपये कॅश मिळाले. पीएसएल लिमिटेडने कॅनरा बँककडून 428 कोट्यवधींचे कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएसएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने आज मुंबईत मोठा छापा टाकला. पीएसएल कंपनीच्या संचालक आणि प्रवर्तकांवर हा छापा टाकण्यात आला. त्यापैकी एक संचालक देवकी नंदनच्या मुंबईतील अंधेरी शहरातील कार्यालयातून सीबीआयला 1 लाख अमेरिकन डॉलर आणि 2 कोटी रोख मिळाले आहेत. हेही वाचा - खरंच शीनाबोरा अजून जीवंत आहे का? CBI च्या दोन शब्दांनी प्रकरणाला पूर्णविराम मिळणार? PSL कंपनीने देशातील 4 सरकारी बँकांकडून 400 कोटींहून अधिक कर्ज घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पीएसएलविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आज सीबीआयने मोठी कारवाई केली. छापेमारीदरम्यान, कंपनीच्या संचालकाच्या ऑफिसात इतकं मोठं घबाड आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या